Description
थोडे थांबून डोळ्यातली आसवे पुसून आणि हात त्यांच्या लकाकत्या डोळ्यांच्या किंचित वर ठेवून ते म्हणाले,
“नानकचंद, तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे. ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटाचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागला. सगळीकडून विशेषतः हिंदू वृत्तपत्रसृष्टीकडून माझ्यावर शिव्याशापांचा वर्षाव सतत होत राहिला. जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला. माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले, त्यांच्याशीही मी दोन दोन हात केले. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहीन. हा काफिला आज जेथे दिसतो तेथे त्याला आणता आणता मला खूप सायास पडले. हा काफिला असाच त्यांनी पुढे आणखी पुढे चालू ठेवावा. त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगायची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफिला पुढे नेण्यास असमर्थ ठरलेच तर किमान तो आज जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे. कोणत्याही परिस्थितीत त्यांनी या काफिल्यास परत फिरू देऊ नये. हा माझा संदेश आहे. बहुधा शेवटचा संदेश आहे. मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे आणि या गांभिर्याला नजरेआड केले जाणार नाही अशी खात्री मला वाटते. जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना, जा आणि सांग त्यांना;’ असे तीनदा पुनरुक्त करून ते म्हणाले.
हे बोलून होताच त्यांना हुंदके फुटले, अश्रू त्यांच्या डोळ्यातून घळाघळा ओघळू लागले.

Reviews
There are no reviews yet.