Description
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आद्य चरित्रकार
तानाजी बाळाजी खरावतेकर (बी.ओ.)
तानाजी बाळाजी खरावतेकर हे मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ‘खरवते’ या गावचे. त्यांचे बालपण व शिक्षण कराची येथे झाले. १९४५ साली इतिहास हा विषय घेऊन त्यांनी मुंबई विद्यापीठाची बी. ए. पदवी मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतरचे कोकणातील पहिले पदवीधर, उदयोन्मुख साहित्यिक. १९४६ साली कराची येथे प्रकाशित झालेले खराबतेकर लिखित ‘डॉक्टर आंबेडकर’ हे चरित्र, आंबेडकर चरित्र लेखनाचा प्रारंभबिंदू आहे. तानाजी बाळाजी खरावतेकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आद्य चरित्रकार होत. ऐन तारुण्यात, १ सप्टेंबर १९४३ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी असाध्य आजाराने, त्यांचे मुंबईतील के. ई. एम. रुग्णालयात निधन झाले.
Reviews
There are no reviews yet.