Description
शिक्षणव्यवस्था तटस्थ असते, असा एक व्यापक समज आहे. शोषणावर आधारलेल्या व मागासलेल्या समाजात शिक्षण हे वैयक्तिक व सामाजिक मुक्तीचे साधन आहे आणि शोषित वर्गाच्या भौतिक उन्नतीसाठी शिक्षणव्यवस्था ही तटस्थपणे वा वस्तुनिष्ठपणे लाभदायी ठरते, असाही समज प्रभावी आहे. अशा स्वरूपाच्या समजामध्ये शिक्षणव्यवस्थेमागे उभ्या असलेल्या सामाजिक-आर्थिक शक्तींची नोंद घेतलेली नसते.
शिक्षणव्यवस्था ही जात्याच मुक्तिदायी नसते. शोषित घटकांतील काही मूठभरांना आधुनिक शिक्षणाच्या आधारे नव्या भांडवली श्रेणीगत रचनेत वरिष्ठ पदांवर स्थानापन्न होण्यासाठी ही व्यवस्था उपयोगी ठरू शकते; परंतु संपूर्ण शोषित वर्गाच्या मुक्तीचे साधन ती ठरू शकत नाही. शोषितांमधील जो अत्यल्प संख्येचा घटक शिक्षणाच्या आधारे उच्चपदस्थ होतो, तोच या विषमतावादी शिक्षणव्यवस्थेला अधिमान्यता प्राप्त करून देतो. ‘या शिक्षणामुळेच आपली उन्नती झाली’, असा भ्रम तो बाळगतो. याच शिक्षणव्यवस्थेत कोट्यवधींना निरक्षर आणि बेकार ठेवले जाते, या वास्तवाकडे डोळेझाक करण्याचे कार्य या भ्रमामुळे साधले जाते. म्हणूनच, महात्मा जोतीराव फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी संघर्ष दिला व त्याचबरोबर शिक्षणव्यवस्थेचे शोषक रूप बदलण्यासाठीदेखील !
Reviews
There are no reviews yet.