डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य

₹450.00

1 in stock

पुस्तकाचे नाव डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य
लेखक इंदिरा आठवले
ISBN 978-81-924883-1-8
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६००
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६४० ग्रॅम

Description

भारताची धार्मिक, सांस्कृतिक व्यवस्था स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय व लोकशाही मूल्यांना पायदळी तुडविणारी आहे. या देशातील सर्वसामान्य माणसाच्या हिताच्या विरुद्ध असलेली ही यंत्रणा धार्मिक शास्त्राचा वापर करीत अनेक वर्षांपासून बहुजनांना गुलामगिरीत ठेवत आहे. प्राचीन भारतात चार्वाक, महावीर, गौतम बुद्ध यांसारख्या महापुरुषांनी तसेच आधुनिक काळात फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हे अंधाराचे साम्राज्य नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी वैदिकांची बौद्धिक दडपणे झुगारून दिली. स्वतंत्र माणूस म्हणून जगण्याची जबरदस्त प्रेरणा बहुजन समाजाला या क्रांतिकारी महापुरुषांनी दिली. वर्णव्यवस्था, कर्मविपाक, शूद्र व स्त्री यांच्यावरील अत्याचाराच्या अनेक रुढी, परंपरा या वैदिक शास्त्रांनी गच्च करून समाजातील माणसामाणसांत तफावत निर्माण केली होती. वरील महापुरुषांनी आपल्या अत्यंत धारदार। विज्ञानवादी, तर्कसंगत, वास्तव तथा मानवतावादी विचारांनी शोषणाच्या सर्व परंपरांना छेद दिला. प्रस्थापित अंधाराचे साम्राज्य खिळखिळे करणारा बौद्धिक प्रकाश या पिढीच्या व्यक्तिमत्त्वातून सर्व समाजाला व्यापू लागला आहे. संकुचित वैदिक संस्कृतीची पिछेहाट होत आहे, असे लक्षात आल्यानंतर इथल्या लोकशाही मूल्यांना काळीमा फासणाऱ्यांनी भारतीय राज्यघटनेचे समीक्षण करण्याची आणि धर्मसंसद निर्माण करण्याची चर्चा सुरू केली आहे. म्हणजे प्रतिक्रांतीचे सावट निर्माण झाले आहे. समतेच्या चळवळीने प्रतिक्रांतीला पिटाळून लावण्याचा निर्धार सर्वांनी केला पाहिजे. ही लढाई मुख्यत्वे बौद्धिक लढाईच आहे. प्रस्थापित सांस्कृतिक गुलामगिरीतून मुक्त व्हायचे असेल, तर तिची मर्मस्थाने व बलस्थाने ओळखून शोषणाचे किल्ले जमीनदोस्त करायला हवेत. प्रतिक्रांति आणणाऱ्यांचे डावपेच ओळखून हल्ला करण्याचे कार्य प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे आज समर्थपणे करीत आहेत. समतेच्या चळवळीतील त्यांच्या या भागीदारीमुळेच मी त्यांच्या  वैचारिक लेखनाकडे आकर्षित झाले. डॉ. आ. ह. साळुंखे यांचे संस्कृत, इंग्रजी आणि मराठी भाषांवर प्रभुत्व आहे. भूत आणि भविष्याचा वेध घेऊन वैदिक परंपरेतील क्रूर डावपेच बहुजनांना उलगडून दाखविण्याची क्षमता त्यांच्यात आहे. या परंपरेच्या विरोधातील आपली क्रांतिकारी परंपरा प्राचीन बहुजनांना समजावून देण्याचे त्यांचे कार्य मला महत्त्वाचे वाटते. समतेच्या लढाईचा प्राचीन इतिहास निर्भय योजना व्याख्यानांमधून व आपल्या लेखनामधून त्यांनी व्यक्त केलेला आहे. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “डॉ. आ. ह. साळुंखे यांचे साहित्य”

Your email address will not be published. Required fields are marked *