ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले

₹25.00

1 in stock

पुस्तकाचे नाव ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले
लेखक हरी नरके
ISBN 978-9382451-37-2
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ४० ग्रॅम

Description

भारताला स्वत:ची एक महान सांस्कृतिक  परंपरा आहे. असा उद्घोष आपण सतत ऐकतो. पण त्याचबरोबर हे ही खरे आहे की भारतवर्षाला धर्मशास्त्रांतील जात-वर्ण-लिंग विषमतेचा कलंकही आहे. त्यामुळेच भारतीय स्त्रीला हजारो वर्षे शिक्षणाची दारे बंद होती आणि त्याला आधार होता ऋग्वेद, मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथाचा ! भारतवर्षात सरस्वती ही स्त्री- देवता विद्येची देवता म्हणून हजारो वर्षे पुजली जात होती, पण इथल्या स्त्रीला मात्र शिक्षण घेण्याचा अधिकार मिळू शकत नव्हता, ही एक लाजिरवाणी शोकांतिका होती. अशा शर्मशास्त्रांच्या अभेद्य वाटणाऱ्या भिंती फोडून ज्ञानाचा प्रकाश भारतीय स्त्रीच्या अंगणात आणण्याचे ऐतिहासिक महत्त्वाचे कार्य क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांनी केले. म्हणूनच त्यांना विद्येची स्फूर्तिनायिका म्हटले जाते. क्रांतिमाता सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा संक्षिप्त लेखाजोखा या पुस्तकात मांडला आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले”

Your email address will not be published. Required fields are marked *