Description
भारतीय संस्कृतीमधील विविध व्यक्ती, घटना, तत्वज्ञानं इत्यादींचे दाखले देत देत भारतीय संस्कृतीचा एक विधायक, निकोप प्रवाह संक्षेपाने वाचकांच्या पुढं ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. हे त्या प्रवाहाचं सर्व समावेशक रूप नव्हे. त्या प्रवाहाच्या काही घटकांचा केवळ नमूना म्हणून किंवा दिशा दाखविण्यापुरता म्हणून उल्लेख केलेला आहे. हे लेखन प्रामुख्यानं तरुण वर्गासाठी आहे. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील काही उमदे घटक त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाला पोषक ठरू शकतील, या भावनेनं ते त्यांच्यापुढं ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.

Reviews
There are no reviews yet.