Description
स्वातंत्र्य – समता – बंधुता याचा खऱ्या अर्थाने पुरस्कार करणारे व जातीयतेवर कठोर प्रहार करणारे अग्रगण्य युगपुरुष म्हणजे महात्मा फुले. आपले तन-मन-धन लावून स्त्रियांना व तळागाळातील लोकांना शिक्षण मिळावे यासाठी आयुष्य वेचणारे ते महात्मा होते. वंचितांना माणूस म्हणून जगता यावे म्हणून आपले सर्वस्व पणाला लावणारे ते महात्मा होते. आपल्या ऐहिक सुखाचा विचार न करता दलितांचा विचार करणारे ते महात्मा होते, बोधिसत्व होते.

Reviews
There are no reviews yet.