Description
‘या लक्षणीय पुस्तकामध्ये माधव खोसला आपल्याला सांविधानिक अर्थबोधाच्या अनियमित विकासाविषयी आणि संविधानाने आपल्या लोकशाही जीवनामध्ये मिळवलेल्या स्थानाविषयी गांभीर्याने विचार करायला भाग पाडतात. भारतीय संविधानाच्या जीवनव्यवहाराशी परिचय करून देणारं आणि त्यासंबंधी विचारांना चालना देणारं हे सर्वोत्कृष्ट पुस्तक आहे – आणि आपल्या वैचारिक अवकाशात एक महत्त्वाचा नवीन स्वर उमटल्याचाही संकेत यातून मिळतो.’
– सुनील खिलनानी,
‘द आयडिया ऑफ इंडिया’ या पुस्तकाचे लेखक
‘हे पुस्तक एका रोमांचक विषयाची विलक्षण रीतीने ओळख करून देतं. आपल्या काळातील पथदर्शी संविधानांपैकी एक असणाऱ्या भारतीय संविधानाविषयी खोसला यांनी विश्लेषणात्मक व मर्मग्राही मांडणी केली आहे.’
– न्यायमूर्ती आहरॉन बराक,
इस्त्राएलचे माजी सरन्यायाधीश
‘क्लिष्ट परिभाषा टाळून सुस्पष्ट भाषेत लिहिलेलं हे चिकित्सक अभ्यासपर पुस्तक वकिलांसाठी आणि वकील नसलेल्यांसाठीही अद्भुत दन्यांनस्त्रोत ठरेल. ‘
– न्यायमूर्ती रूमा पाल,
माजी न्यायाधीश, भारताचं सर्वोच्च न्यायालय
कोट्यावधी लोकांना स्वत:ची एक ओळख देणारं भारतीय संविधान जगातील महान राजकीय संहितांपैकी एक आहे. सत्तर दशकांपूर्वी हे संविधान तयार करण्यात आलं, तेव्हापासून त्याची सहनशीलता आणि कामकाजाची पद्धत अनेकांसाठी लक्षवेधी आणि आश्चर्यकारक बाब ठरली आहे. या संक्षिप्त परिचयपर पुस्तकांमध्ये माधव खोसला यांनी भारतीय संविधानाची अनेक वैशिष्ट्य, त्यातून व्यक्त होणाऱ्या आकांक्षा आणि त्याच्याशी निगडीत वादविवाद यांवर प्रकाश टाकला आहे. संविधानाने विभिन्न राजकीय कृतिघटकांमध्ये सत्तेचं विभाजन कस केलं? संविधानाने नागरिकत्त्वाचं कोणतं रूप आत्मसात केलं ? आणि संविधानात बदल कसा होतो ? यांसारख्या प्रश्नांची उत्तरं देताना खोसला सांविधानिक दस्तावेजाचा विलक्षण आव्हानात्मक प्रवास उलगडत जातात. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणाऱ्या भारतातील संविधानवादाचा सिद्धांत आणि व्यवहार यांबद्दल वाचकांना चिंतनासाठी प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे.
Reviews
There are no reviews yet.