भारतीय संस्कृती आणि अहिंसा

200.00

1 in stock

पुस्तकाचे नाव भारतीय संस्कृती आणि अहिंसा
लेखक धर्मानंद कोसंबी
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २३१
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २३९ ग्रॅम

Description

थेट बाबीलोनीयन-मेसोपोटेमीयन संस्कृती आणि सैंधव व आर्यसंस्कृती यांच्यापासून प्रारंभ करून सातत्य आणि परिवर्तनाचा हा गुंतागुंतीचा इतिहास, बौद्ध व जैन श्रमण परंपरा, पौराणिक ब्राह्मणी परंपरा आणि आधुनिक काळ यांच्यामधील गतीशास्त्रांची आणि द्वंद्वांची सुटसुटीत मांडणी या इतिहास ग्रंथात केली आहे. पाच प्रकरणे आणि प्रत्येक प्रकरणातील एका एका मुद्याची / घटिताची उकल करीत जाणारे अनुक्रमांकित परिच्छेद यामधून भारतीय श्रमण परंपरेतील शीलाधिष्ठित जीवनमार्गाचे कालातित औचित्य, आचार्य स्पष्ट करीत जातात. भारतभूमीतून बुद्धधम्माचा लोप होण्याच्या अंतर्गत आणि बाह्य कारणांचा उहापोह करीत, बुद्ध धम्माचा प्रभाव ख्रिश्चन धर्मातील नीतीतत्त्वांवर तसेच अलिकडील भक्तीपरंपरेतील संप्रदायांच्या विचारसरणींवर कसा पडला त्याची प्रत्यक्ष कारणे (मध्य आशियापर्यंत बुद्धधम्माचा प्रसार), आणि अप्रत्यक्ष कारणे (जनमानसात १८०० वर्षे रुजलेली बौद्धजीवनमार्गाची नीतीतत्त्वे) यांचे विश्लेषण आचार्य या ग्रंथात करतात. या विश्लेषणामध्ये आपणास दोन जीवनमार्गांच्या संस्कृतींच्या प्रदीर्घ कालखंडाचे चित्र स्पष्ट दिसते. एक बहुजनशोषक ब्राह्मणी अभिजन परंपरा आणि दुसरी बहुजन हिताय बहुजन सुखाय श्रमण परंपरा. या पैकी बहुजन हितलक्ष्यी श्रमण बौद्ध परंपरेची प्रेरणा आजच्या समाजाने घ्यावी याचे स्पष्ट दिशानिर्देश या इतिहास लेखनामध्ये मिळतात.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारतीय संस्कृती आणि अहिंसा”

Your email address will not be published. Required fields are marked *