Description
त्रिपिटकात एकाच ठिकाणी सबंध बुद्धचरित्र नाही. ते जात कठ्ठकथेच्या निदानकथेत सापडते. ही अठ्ठकथा बुद्धघोषाच्या समकाली म्हणजे पाचव्या शतकात लिहिली असली पाहिजे. त्याच्यापूर्वी ज्या सिंहली अठ्ठकथा होत्या त्यातील बराच मज़कूरा ह्या अठ्ठकथेत आला आहे. हे बुद्धचरित्र मुख्यत्वे ललितविस्तराच्या आधारे लिहिले आहे. ललितविस्तार इसवी सनाच्या पहिल्या शतकात किंवा त्यापूर्वी काही वर्षे लिहिला असावा. तो महायानाचा ग्रंथ आहे; आणि त्यावरूनच जात कठ्ठाकथाकाराने आपली बुद्धचरित्राची कथा रचली आहे. ललितविस्तर देखील दीघनिकायातील महापदानसुत्ताच्या आधारे रचला आहे. त्या सुत्तात विपस्सी बुद्धाचे चरित्र फार विस्ताराने दिले आहे; आणि या चरित्रावरून ललित विस्तरकाराने आपले पुराण रचले. अशा कथांतून बुद्धचरित्रासंबंधाने विश्वसनीय गोष्टी कशा काढता येतील, हे दाखविण्याच्या उद्देशाने मी हे पुस्तक लिहिले आहे.

Reviews
There are no reviews yet.