Description
आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्याचाराच्या जोरावर बुद्धधर्माची लाट परतवून लावली. परंतु आता बुद्धधर्माची लाट येईल, ती कधीही परत जाणार नाही. ह्या अफाट सागराला भरती येईल पण ओहटी येणार नाही. भगवान बुद्धाच्या संघटनेत काही त्रुटी राहिल्या. काही छिद्रे राहिली होती. म्हणून त्या छिद्रांद्वारे बाहेरील पाणी आत येऊन बुद्धधर्माचा प्रवाह थोड़ा दूषित झाला होता. परंतु आता मी त्या धर्माची डागडुजी करून ती छिद्रे बुजविणार आहे…
भगवंताच्या बुद्धधर्मात जी त्रुटी आहे त्याचा सविस्तर विचार मी त्या पुस्तकात मांडणार आहे. ते पुस्तक प्रत्येकाला विकत घ्यावे लागेल व त्या पुस्तकातील ठराविक प्रश्नांची उत्तरेही प्रत्येकाला द्यावी लागतील. तरच त्याला बुद्ध धर्मात प्रवेश मिळेल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मुंबई, दि. २४ मे १९५६ (बुद्धजयंती)

Reviews
There are no reviews yet.