Description
सर्व दुःखांचे मूळ लालसा हेच असून, त्यापासून मुक्तता मिळवली पाहिजे. ” लालसेतून लोभाचा जन्मा होतो. लोभातून भीतीचा जन्म होतो; निरिच्छ व्यक्तीला दुःखही नसते आणि भीतीही. लालसेच्या बेड्यांमध्ये अडकलेल्यास त्यापासून स्व:ताला मुक्त करणे कठीण जाते, असे बुद्ध सांगत. इच्छापूर्तीमुळे मिळणाऱ्या आनंदाची पर्वा न करणारा स्थितप्रदन्य लालसांना दूर करतो आणि त्यापासून दूर जातो. जसे, एखादा चर्मकार चामड़े चांगले तासून घेतो आणि नंतर त्याचा वापर जोडे बनविण्यासाठी करतो. त्यामुळे जेव्हा एखादा मनुष्य इच्छांचा त्याग करतो, तेव्हाच त्याला सर्वोच्च आनंद प्राप्त होतो. इच्छा कधीच तृप्त होत नसतात. समाधान द्न्यानातून प्राप्त होते. बुद्धाच्या खऱ्या शिष्याला परमेश्र्वरामध्येही आनंदी प्राप्ति होत नाही; त्याला केवळ इच्छांचा त्यागा केल्यानेच आनंदाची प्राप्ती होते.” या सर्व शिकवणीचे सार थोडक्यात असे सांगता येईल, ” सर्व प्रकारची दुष्कृत्ये टाळा, सद्गुणांची कास धरा, मनावर पूर्ण नियंत्रण मिळवा, हेच बुद्धाचे तत्त्वादन्यान आहे.
Reviews
There are no reviews yet.