Description
कै. चांगदेव खैरमोडे यांनी लिहिलेल्या ”अस्पृश्यांचा लष्करी पेशा” या पुस्तकात ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीत असलेल्या महार सैनिकांच्या तुकड्यांचा व इसवी सन १९४१ मध्ये उभ्या केलेल्या महार रेजिमेंट मधील महार सैनिकांच्या बहादुरीचा व कर्तव्यपरायणतेचा मानाने उल्लेख केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या अनेक लहान मोठ्या लढाया झाल्या त्या सर्व लढायांत महार पलटणींनी उल्लेखनीय कर्तबगारी दाखविली आहे.
या पुस्तकाचे नाव जरी ”अस्पृश्यांचा लष्करी पेशा” हे आहे, तरी यात महारांच्या खेरीज इतर अस्पृश्य जमातींचा निर्देश नाही. या इतर जातींचाही विशेषत: मांग, रामोशी व चांभार जातीचा लष्करी पेशाशी संबंध होता. छत्रपती शिवाजी महाराज रामोशी व मांग जातींचा किल्ल्यांच्या बाहेरील परिसराचे संरक्षण करण्यासाठी नेहमी उपयोग करीत. दुसऱ्या महायुद्धात चांभार जमातीची एक फलटण उभी केली होती. एकंदरीत महार, मांग, रामोशी व चांभार जातींच्या अस्पृश्यांनी लष्करात ईमाने इतबारे व उल्लेखनीय कामगिरी बजावली यात शंका नाही. त्यांच्या वंशजांना याचा गर्व वाटला पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.