Description
भारताच्या राष्ट्रध्वजावरील अशोक चक्र आणि देशाची राजमुद्रा सम्राट अशोकाशी आपले अतूट नाते दर्शवितात. तरीही शतकानुशतके हा अद्वितीय सम्राट विस्मृतीच्या धुक्यात हरवला होता.
त्याची ही शोधकथा आपल्याला ग्रीस, इजिप्त तसेच सप्तसिंधूंच्या प्रदेशातून भारतीय उपखंडाच्या चारही कोपऱ्यात घेऊन जाते. या प्रवासात सिकंदर (अलेक्झांडर), चंद्रगुप्त, हर्षापासून गुप्त व सातवाहनांपर्यंत अनेक सम्राट आपल्याला भेटतात. कधी चीनच्या फ़ाहेन व ह्युएन – त्संगच्या साहसी प्रवासातील तपशीलवार नोंदी दिशानिर्देश करतात. कधी आपण महिंद्र व संघमित्रबरोबर श्रीलंकेच्या यात्रेवर जातो.
प्रतिभाशाली चाणक्यापासून भांडारकर – नेहरू – आंबेडकर अशा अनेक दिग्गजांची भेट ह्या प्रवासात होते. अलेक्झांडर कनिंगह्याम प्राच्यविद्यापंडित या कथानकाचे आगळेवेगळे नायक आहेत. ते संस्कृत – पाली ग्रंथ, स्तंभलेख, शिलालेख, प्रवासवर्णने, ताम्रपट व नाणी अशा अनेक ऐतिहासिक साधनांच्या आधारे अशोकाची भेट घडवून आणतात.

Reviews
There are no reviews yet.