Description
“एकोणिसाव्या शतकात भारतात आर्थिक विचार मांडला तो ब्रिटिश साम्राज्यवादाचे स्वरूप समजून आलेल्या सुरुवातीच्या विचारवंतांनी. तसे पाहता सर्वप्रथम राजा राममोहन राय यांनी ‘खंडणी’ या शब्दात आर्थिक शोषणाचे वर्णन केले. जगन्नाथ शंकरशेट, बाळशास्त्री जांभेकर, डॉ. भाऊ दाजी लाड, भास्कर पांडुरंग तर्खडकर, रामकृष्ण विश्वनाथ, भाऊ महाजन, लोकहितवादी, हरि केशवजी पाठारे, कृष्णशास्त्री चिपळोणकर, महात्मा फुले, कृष्णराव भालेकर, नारायण मेघाजी लोखंडे, मुकुंदराव पाटील यांनी या विचारात भर घातली. पण राष्ट्रवादी आर्थिक विचारांची पद्धतशीर मांडणी सर्वप्रथम केली ती दादाभाई नौरोजी, न्या. रानडे, आर. सी. दत्त, सार्वजनिक काका, लो. टिळक, यांनी. स्वदेशीची चळवळ चालवून आर्थिक प्रभावर जनतेत जागृती घडवून आणली. गणेश व्यंकटेश जोशी, न्या. तेलंग, दिनशा वाच्छा, विष्णू मोरेश्वर महाजनी, न्या. नारायण गणेश चंदावरकर, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, गोविंद गोपाळ टिपणीस, गोपाळ अनंत भट यांनीही प्रभावी आर्थिक विचार मांडले. शाहू महाराजांनी तर कल्याणकारी आर्थिक धोरणांची अंमलबजावणीही केली होती. मूळच्या आर्थिक प्रश्नास जहाल नेत्यांनी व महात्मा गांधीजींनी राजकीय स्वरूप दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थचिंतनही भारताच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.”
Reviews
There are no reviews yet.