अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे

900.00

99 in stock

पुस्तकाचे नाव अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे
लेखक पी. एन. शिंदे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ७०४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १०२५ ग्रॅम

Description

दिल्ली काबीज करून तेथील सार्वभौम तख्तावर बसण्याची शिवछत्रपतींची  महत्त्वाकांक्षा होती.  बसण्याची शिवछत्रपतींची महत्त्वाकांक्षा  होती.  किंबहुना ते त्यांचे ध्येयच होते. पण त्याच्या उलट त्यांचे नातू – शाहू महाराज यांचे धोरण होते. कोणत्याही परिस्थितीत मोगल बादशाहीला हाट न लावता मराठ्यांनी हिंदुस्थानात आपली सत्ता चौथ  व सरदेशमुखीच्या साधनांनी प्रस्थापित करावी, असे मार्गदर्शक तत्त्वच त्यांनी पेशवा बाजीरावास व त्या पुढच्या त्याच्या वारसदारांस घालून दिलेले होते . शाहू महाराजांनी घालून दिलेला हां दंडक ना पेशव्यांनी मोडला ना महादजींनी  मोडला. महादजींचे चरित्र वाचत असता न कळत वाचकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, इतकी सोन्यासारखी संधी येऊनही दिल्लीच्या तख्तावर महादजी का बसले नाहीत! त्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की शाहू महाराजांनी मराठ्यांची मानसिकताच  अशी निर्माण केलेली होती की दिल्लीच्या तख्तावर आपण बसायचे नाही. आपण बादशाहीच्या कारभारीपणावरच संतुष्ट राहावे. दिल्लीच्या तख्तावरच महादजी शिंदे बसले नाहीत ही खंत मराठी माणसांच्या मनात असली, तरी त्यांचे पराक्रम व कर्तबगारी यांस तत्कालीन हिंदुस्थानात तरी तोड नव्हती. पाच कोटी महसूलाचे राज्य त्यांनी पैदा केले होते. ‘ एक लक्ष सत्तर हजाराची फौज’ त्यांनी उभी केली होती, त्यापैकी 40-45 हजाराची कवायती फौज होती. दिल्ली, आग्रा, अजमेर यासारखे सतरा किल्ले त्यांच्या हातात होते. इंग्रज काहीही म्हणोत पण या देशातील सत्ता त्यांना शिंद्यांशी लढूनच काबीज करावी लागली. मराठ्यांच्या अनेक चुकांमुळे इंग्रजांना इतक्या लवकर हिंदुस्थानच्या साम्राज्याचे फळ प्राप्त झाले, नाही तर आणखी पन्नास वर्षे तरी त्यांना हिंदुस्थान जिंकता आला नसता.                                                                                                                                                                                                     `   

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “अलिजाह बहाद्दर महादजी शिंदे”

Your email address will not be published. Required fields are marked *