शोधयात्रा अंध कल्याणाची

270.00

10 in stock

पुस्तकाचे नाव शोधयात्रा अंध कल्याणाची
लेखक विजय कदम
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २७० ग्रॅम

Description

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर घटनाकारांमुळे आपल्या समाजजीवनातील “गावकुसाबाहेरची वस्ती’‘ अस्तंगत झाली. मात्र सामाजिक मानसिकतेमध्ये व संशोधन व्यवहारात  तिचा प्रत्यय  येतच राहिला. मी माझ्या विद्यार्थ्यांना असे सांगत आलो की, संशोधन व्यवहारातील गावाकुसाबाहेरच्या वस्तीला संशोधनाच्या मुख्य प्रवाहात आणा. अलीकडच्या काळात स्त्रिया, ग्रामीण  जनता, शेतकरी, कामगार, दलित असे  दुर्लक्षित विषय इतिहास संशोधनात समाविष्ट होऊ लागले, ही स्वागतार्ह बाब आहे. पण तरीही अंध – अपंगांसारखे घटक संशोधनाच्या गावकुसाबाहेरच होते. विजय कदम या स्वत: अंधत्व अनुभवणाऱ्या माझ्या  विद्यार्थ्याने जगाला वाटणारी त्याची कमतरता हीच त्याची संशोधकीय शक्ती बनवावी, अशी माझी अपेक्षा होती. विजय कदम यांनी ती अपेक्षा नुसती पूर्ण केली असे नव्हे, तर दिव्यांगत्वाची दिव्यदृष्टी काय असू शकते हे सिद्ध करणारी जिगरबाज जीवनदृष्टी बाळगून चौफेर प्रगती साधली. या प्रगतीचे सुंदर फलित म्हणजे “शोधयात्रा अंध कल्याणाची”  हे संशोधनपर पुस्तक. त्याच्या नावातच त्याचा आशय व्यक्त होतो. हे पुस्तक समाजशील  व कृतिनिष्ठ संशोधनाचे एक नवे दालन मराठीत खुले करत आहे. जात – वर्ग – लिंगभाव  यांचा विशाल संदर्भ लक्षात घेऊन अंधत्त्वाची संशोधकीय चर्चा त्यामध्ये केलेली आहे. अंधकल्याणाच्या शोधयात्रेचा हा पहिला अध्याय आहे. डॉ. विजय कदम ही शोधयात्रा समर्थपणे पुढे नेत राहतील, याची मला खात्री वाटते.

 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “शोधयात्रा अंध कल्याणाची”

Your email address will not be published. Required fields are marked *