Description
बर्ट्रांड रसेल (१८७२१९७०) हे ब्रिटनमधील प्रसिद्ध तत्त्वज्ञ, गणितज्ञ, तर्कशास्त्रज्ञ आणि लेखक होते. आधुनिक तर्कशास्त्र व विश्लेषणात्मक तत्त्वज्ञानाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी अल्फ्रेड नॉर्थ व्हाईटहेड यांच्यासह ‘प्रिन्सिपिया मैथेमैटिका’ हा ग्रंथ लिहिला. रसेल हे मानवी स्वातंत्र्य, शांतता आणि विवेकवादाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी युद्धांविरोधी भूमिका घेतली व अण्वस्त्रांच्या विरोधात आवाज उठवला. १९५० साली त्यांना साहित्यासाठी नोबेल पारितोषिक मिळाले. त्यांच्या लेखनातून स्पष्ट विचार, तर्क आणि मानवी मूल्यांचा आग्रह दिसून येतो. ‘एज्युकेशन अन्ड द सोशल आर्डर’ हे त्यांचे पुस्तक १९३२ मध्ये प्रकाशित झाले. म्हणजे आज या पुस्तकाला ९३ वर्षे उलटली आहेत. मात्र, त्यामध्ये रसेल यांनी मांडलेले विचार आजही कालसुसंगत आहेत. यावरून त्यांची मौलिकता दिसून येते. शिक्षणातील वर्णश्रेष्ठता, आर्थिक विषमता, भेदाभेद, लैंगिक शिक्षण द्यावे की न द्यावे या मुद्द्यांवर आजही तावातावाने चर्चा झडतात. वाचक, शिक्षण क्षेत्रातील जाणकार यांच्यासाठी हे पुस्तक नक्कीच मार्गदर्शक ठरेल.

Reviews
There are no reviews yet.