रूपयाची समस्या त्याचे मूळ व त्यावरील उपाय

860.00

1 in stock

पुस्तकाचे नाव रूपयाची समस्या त्याचे मूळ व त्यावरील उपाय
लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ISBN 978-93-81621-33-2
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ४०६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५४० ग्रॅम

Description

रूपयाची समस्या
इ.स. १९२३ च्या दुसऱ्या तिमाहीत जागतिक शिक्षण क्षेत्रात आश्चर्यकारक आणि अभुतपूर्व अशी घटना घडली. इंग्लंडच्या विद्यापीठामध्ये डॉ. चाचासाहेब आंबेडकरांची डी. एम्‌सी. या सर्वोच्च पदासाठी मौखिक परिक्षा सुरू आहे. परिक्षा घेणारे हेरॉल्ड लास्कीसारखे जगप्रसिध्द सहा अर्थतज्ज्ञ बसले आहेत. त्यात मार्गदर्शक प्रो. एडविन कॅनन बसले आहेत. या साऱ्यांनी दि प्रॉब्लेम ऑफ रूपी…. हा प्रबंध वाचला आहे.

जगभरात मान्यता पावलेला प्रो. केन्स यांचा अर्थशास्त्रांचा सिद्धांत चुकीचा असून त्यावर आधारलेले ब्रिटीश सरकारचे धोरण भारतातील जनतेची लूट करतांना रूपयाच्या विनीमय दराचे माध्यम वापरते हा या प्रबंधाचा मुख्य विषय आहे.

हा प्रबंध इंग्रज राज्यकर्त्यांच्या  विरोधात असल्याने या प्रबंधाला अमान्य करून डॉ. बाबासाहेबांना नापास करावे हे तज्ज्ञांनी ठरविले आहे.

तज्ञ परिक्षकांसमोर बाबासाहेबांची मौखिक परिक्षा सुरू झाली. परिक्षकांनी धोरणविषयी प्रश्न विचारले त्यात ते हरले. मग सिध्दांताविषयी विचारले त्यात ते हरले मग चिकित्सा पध्दतीविषयी विचारले त्यातही त्यांची निराशा झाली. मग त्यांनी प्रबंधात वापरलेल्या काही शब्दांवर आक्षेप घेतले, बाबासाहेबांनी त्यांच्याच डिक्शनरीतील त्या शब्दांचे अर्थ दाखविले आणि त्या अर्थासाठीच ते शब्द वापरले हे सांगीतले, शेवटी त्यांचा पूर्णपणे नाईलाज झाला मग त्यांनी तडजोडीची बोलणी सुरू केली.

डिग्री मिळावी म्हणून आपल्या सत्य संशोधनाबद्दल कुठलीही तडजोड करायला बाबासाहेब तयार नाहीत. जगातले हे आतापर्यंत न घडलेले एकमेव उदाहरण आहे

अखेरीस त्यांनी परिक्षकांनाच प्रतिप्रश्न केले “माझ्या प्रबंधातील कोणता मुद्दा  चुकीचा आहे हे मला दाखवून द्या” या प्रश्नाचे उत्तर मात्र परिक्षकांना देता आले नाही. त्यावेळी रागारागाने डॉ. आंबेडकर म्हाणाले “तुम्ही मला पदवी दिली नाही तरी चालेल मी हा प्रबंध हिंदुस्थानात प्रसिध्द करीन आणि मग जगाची खात्री पटेल की माझी मते शास्त्रीय  आणि बरोबर आहेत”.

शेवटी लंडनच्या विद्यापीठाने बाबासाहेबांना डी.एस्सी. ही सर्वोच्च पदवी दिली. आपल्या देशाला लुटणारे इंग्रज सरकार आहे. हे सत्य त्यांनी इंग्रजांच्या विद्यापीठात मांडले.

अत्युच्च देशप्रेम आणि उत्कट देशभक्ती यापलीकडे दूसरी कोणती असूच शकत नाही. भारताचा महान देशभक्त म्हणून डॉ. बाबासाहेबांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रूपयाची समस्या त्याचे मूळ व त्यावरील उपाय”

Your email address will not be published. Required fields are marked *