मराठा – कुणबी समाजाची दशा आणि दिशा

45.00

1 in stock

पुस्तकाचे नाव मराठा – कुणबी समाजाची दशा आणि दिशा
लेखक मा. म. देशमुख
ISBN --
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ९४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६० ग्रॅम

Description

मराठा – कुणबी समाज हा महाराष्ट्रात संख्येने सर्वात मोठा समाज आहे. परंतु जवळपास ९५ टक्के समाज खेड्यांत राहतो.  शेतात राबतो, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धांचा प्रभाव  आणि रूढ़ी परंपरांचा दबाव यामुळे त्याचा ‘ स्वभाव ‘ विशिष्ट प्रकारचा बनलेला आहे .

दुरुपयोग – कोणताही मोठा समाज जागृत नसला आणि अडाणी असला तर कुटिल, क्रूर आणि स्वार्थी लोक त्याची दिशाभूल करतात.  त्याचा दुरुपयोग करतात.  ते अशा समाजात आपले ‘ हस्तक ‘ पेरतात.  त्यांच्या मदतीने जातीय तणाव वाढवितात.  इतर अल्पसंख्य समाजावर अन्याय – अत्याचार करतात.  ‘ देशापेक्षा देव मोठा ‘ असा चुकीचा समज करून देतात.  ‘ देवभक्ती आणि धर्मभक्ती म्हणजेच देशभक्ती होय,’ असा गैरसमज पसरवितात.  दूरदर्शन, सिनेमा, वर्तमानपत्रे वगैरे प्रसारमाध्यमे त्यांचीच असल्यामुळे त्यांना मदत करतात. देवा – धर्माच्या नावाखाली जातीय दंगली घडवून आणतात.  दंगलींमुळे राष्ट्रीय संपत्ती नष्ट होते.  भ्रष्टाचार, काळाबाजार वाढतो.  महागाई वाढते, महागाई वाढणे म्हणजे गरीबी वाढणे होय.

  • भारतातील प्रत्येक समाज सुखी, तर भारत सुखी म्हणून आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी उपाय कोणते ?
  • उत्तम संतती, तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र सुरक्षित.
  • संतती कशी घडवावी ? कशी शिकवावी ?
  • अभ्यास कसा करावा ? परीक्षेची तयारी कशी करावी ?
  • पेपर कसा सोडवावा ? मेरीटचे गुपित कोणते ?
  • शेतीपेक्षा नोकरीच का महत्त्वाची ?
  • उद्योग आणि व्यापार कसा वाढवावा ?
  • देव कुठे आहे ?
  • गरीबी कशी वाढते ? कोण वाढवितात ?
  • आपले शत्रू कोण ? मित्र कोण ?
  • समाजाची ‘ बिगर राजकीय मुळे’ कशी मजबूत करावीत ?
  • आपले संघटन कसे उभारावे ?

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “मराठा – कुणबी समाजाची दशा आणि दिशा”

Your email address will not be published. Required fields are marked *