Description
कंबोडियामध्ये बौद्ध आणि हिंदू मंदिरांमध्ये गुलाम होते. ‘ख्मेर मंदिराच्या अर्थकारणावर गुलाम श्रमशक्तीचे वर्चस्व होते. स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही लिंगांच्या गुलामांना मंदिरांमध्ये वाहिले जात होते. त्यांच्यामध्ये मुलांचाही समावेश होता… मंदिरांच्या क्षेत्रात या गुलामांकडून लागवड करून घेतली जात होती आणि उत्पादनातील निश्चित वाटा त्यांना विशिष्ट निश्चित प्रसंगी दिला जात होता. गुलामांना दिली जाणारी वागणूक नेहमीच पुरेशा प्रमाणात मानवतावादी असल्याचे मात्र दिसत नाही.
“स्त्री आणि पुरूष अशा दोन्ही प्रकारच्या गुलामांना अगदी सुरवातीच्या काळापासून मठांमध्ये कामावर ठेवण्यात येत होते आणि त्यांच्या देखभालीसाठी मोठ्या प्रमाणात पैसाही राखीव ठेवला जात होता.’ सिलोनच्या राजाकडून पकडून आणण्यात आलेल्या युद्धबंद्यांचाही या गुलामांमध्ये समावेश होता. भारताच्या वायव्येला असलेल्या चिनी तुर्कस्तानात सापडलेल्या दुसऱ्या शतकापासूनच्या दस्तऐवजांमधून तो देश बौद्ध धर्मीयांच्या प्रभावाखाली असतानाची रोचक माहिती आढळते. त्यावेळी तिथली सामाजिक रचना भारतीय सामाजिक रचनेसदृश नव्हती. मात्र गुलामगिरीच्या प्रथेतून तिथे अनेक ठिकाणी विनयाचा अधिकार चालत असल्याचे दिसून येते. बौद्ध भिक्षुंकडे (भिक्खुंकडे) त्यांचे स्वत:चे गुलाम होते आणि गरजेनुसार ते स्वत:साठी त्यांची खरेदी करत होते किंवा त्यांची अदलाबदल करत होते असे दिसून येते.
Reviews
There are no reviews yet.