Description
वेदपूर्वकालापासून तो अद्ययावत घडलेल्या इतिहासपूर्ण व इतिहासकालीन घटनांचा परामर्श यात संक्षेपाने घेतला आहे. हा परामर्श घेत असताना सामाजिक रूढ़ी किंवा चालीरीती, उच्चनीच धार्मिक विचार प्रवाह, धार्मिक परिवर्तने, राजकीय घडामोडी इत्यादींचे विवेचनही यात संदर्भानुसार आले आहे. ही सर्व मीमांसा ब्राह्मण किंवा पुरोहितवर्ग यांच्या वर्चस्वाच्या अनुरोधाने आली आहे. मुख्य प्रेरणा कार्ल मार्क्सची. त्याच्या वर्ग विग्रह व पिळवणूक या ऐतिहासिक भौतिकवादाच्या तत्त्वापासून डॉ. मुरंजन यांस ही प्रेरणा मिळाली आहे, हे त्यांनी प्रथमच स्पष्टपणे सांगून टाकले आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रथम महाराष्ट्रात ब्राह्मणी वर्चस्वाच्या मीमांसेचा शुभारंभ केला; त्याच सुमारास ब्राह्मण व ब्राह्मणविद्या यांचे निष्कर्ष जवळजवळ एकच आहे. त्यानंतर या विषयावर मराठी व इतर भारतीय भाषांमध्ये परंपरागत हिंदू धर्म, जातिसंस्था आणि पुरोहितवर्गाच्या वर्चस्वाचे अनिष्ट परिणाम यांची मीमांसा ब्राह्मसमाज, आर्यसमाज, अन्य धार्मिक व सामाजिक सुधारक, तमिलनाडूमधील जस्टिस पार्टीचे प्रवक्ते इत्यादिकांनी केली आहे. या मीमांसेत या पुस्तकाने अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण अशी भर घातली आहे.
Reviews
There are no reviews yet.