Description
‘भिक्षुकशाहीचे बंड’ हिंदु समाजातच आहे असे नाही. परमेश्वर जसा अखिलचराचर व्यापक आहे, तो जेथे नाही असे ठिकाणीच जसे कोठे नाही तसे ह्या भिक्षुक शाहीचे बंड ही सर्वत्र आहे. ते जसे हिंदूंमध्ये आहे तसेच पारशांमध्ये आणि मुसलमानांमध्येही आहे. ते ख्रिस्त्यात आहे. जैनात आहे आणि फार तर काय पण नास्तिक म्हणून मानिल्या गेलेल्या बौद्धांतही ते आहे. ‘भिक्षुकशाहीचे बंड’ जसे हिंदुस्थानात आहे तसेच आज साऱ्या जगाने सुधारणेच्या शिखरावर नेऊन बसविलेल्या युरोपात आणि अमेरिकेतही ते आहे. जगाच्या पाठीवर असा एक ही समाज नाही, ह्या पृथ्वीवर असा एकही धर्म नाही आणि ह्या भूपृष्ठावर असा एक ही देश नाही की जेथे ‘भिक्षुकशाहीचे बंड’ आहे.

Reviews
There are no reviews yet.