Description
शिवरायांना प्रतिकूल अवस्थेत स्वराज्याची स्थापना व उभारणी करावी लागली. त्यामुळे वेदोक्त व शाक्त असे परस्पर विरोधी संस्कार त्यांना स्वीकारावे लागले. छत्रपती संभाजी महाराजांना मात्र शाक्त धर्माची पार्श्वभूमी लाभल्यामुळे वैदिक राज्याभिषेक करण्याची आवश्यकता त्यांना भासली नाही. अर्थात त्यांनी वर्णाश्रम या आर्यांच्या व्यवस्थेतील क्षत्रियत्वाचा स्वीकार केला नाही. स्त्रीसन्मान, अस्पृश्यताविरोध, सामाजिक समता अशा उच्चमानवी मूल्यांचा स्वीकार करणाऱ्या शाक्तधर्मानुसार ते वागत असत. या धर्माच्या रक्षणाकरिता त्यांनी आपल्या प्राणांचीही पर्वा केली नाही. शाक्तपंडित कविकलशाच्या रक्षणाकरिता ते धावून गेलेत. स्वतःच्या पत्नीला राज्यव्यवस्थेचे अधिकार देऊन शाक्तधर्मानुसार ते वागलेत. म्हणून त्यांना भेदभावावर आधारित चातुर्वर्ण्याचा दुय्यम भाग असलेले क्षत्रियत्व स्वीकारणारे क्षात्रवीर म्हणणे अनुचित होय. याउलट समतेची प्रतिष्ठापना करणाऱ्या क्षात्रधर्माची जपणूक करणारे म्हणून शाक्तवीर म्हणून संबोधणेच योग्य आहे.
Reviews
There are no reviews yet.