रिबेल्स अगेन्स्ट द राज

630.00

1 in stock

पुस्तकाचे नाव रिबेल्स अगेन्स्ट द राज
लेखक रामचंद्र गुहा
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५३२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ७५० ग्रॅम
Category:

Description

भारतीय स्वातंत्र्यासाठी झालेला संघर्ष आणि लढा यांचा असाधारण इतिहास म्हणजे ‘रिबेल्स अगेन्स्ट द राज’ हे पुस्तक होय.

जो देश स्व:ताचा नाही, त्याच्यासाठी लढणाऱ्या सात वीरांची ही बव्हंशी अपरिचित अशी कहाणी आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला हातभार लावण्यासाठी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीपासून हे विदेशी वीर देशात दाखल होऊ लागले होते.

या सातांपैकी चार ब्रिटिश होते, दोन अमेरिकी होते, तर एक आयरिश होती. त्यांत चार पुरूष आणि तीन स्त्रिया होत्या.  कारावास भोगण्याआधी वा हद्दपार केले जाण्याआधी त्यांनी अनेक क्षेत्रांत पायाभूत कार्य केले होते.  त्यांत पत्रकारिता सामाजिक सुधारणा, शिक्षण, सेंद्रीय शेती आणि पर्यावरण यांचा अंतर्भाव होता.

हे पुस्तक त्यांच्या कहाण्या सांगते.  प्रत्येक बंडखोर आदर्शवाद आणि सच्या समर्पण वृत्तीने भारावलेला होता.  प्रत्येक या ना त्या प्रकारे गांधींशी जोड़ला गेलेला होता.  त्यांतील काही अनुयायी म्हणून तारा काही त्यांच्या दृष्टिकोनाचे संतप्त विरोधक म्हणून संघर्षाची परिणती तुरुंगवासात होऊ शकते, आणि त्यांचे उर्वरित आयुष्य भारतातच जाऊ शकते वा येथेच त्यांचा मृत्युही होऊ शकतो, याची खूणगाठही प्रत्येकाने मनाशी बांधलेली होती. आपापल्या कार्यक्षेत्रात प्रत्येकाने आपला अमीट ठसा उमटवला होता आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्था तसेच त्यांनी घडविलेल्या पिढ्या व व्यक्ती यांच्या रुपाने त्यांचा वारसा आजही जिवंत आहे.  आपसात गुंतलेल्या त्यांच्या जीवन प्रवासाच्या या गोष्टी, जगातील सर्वोत्तम इतिहासकारांमध्ये गणल्या जाणाऱ्या लेखकाने लक्षवेधकपणे मांडल्या आहेत.  अर्थात या केवळ गोष्टी नाहीत, तर भारत आणि पाश्चात्य जग यांचे संबंध, ब्रिटिश वसाहतवादी सत्तेपलीकडील आपली ओळख तसेच नागरी स्वातंत्र्ये यांचा शोध घेणारे राष्ट्र म्हणून भारताची धडपड, यांविषयीची सखोल अंतर्दृष्टी देणाऱ्या अनोख्या कहाण्या आहेत. 

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रिबेल्स अगेन्स्ट द राज”

Your email address will not be published. Required fields are marked *