Description
मा. सां. कन्नमवार
”राजमाता जिजाबाई” हे जिजाऊंचे वैशिष्ट्यपूर्ण चरित्र महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत मा. मा. सां. कन्नमवार यांनी लिहिलेले असून ते मुख्यमंत्री असतानाच जिजाऊंच्या स्मृतिदिनी दि. १७ जून १९६३ रोजीच सिंदखेड राजा येथे प्रकाशित केलेले होते. दुर्दैवाने पुढे दि. २४ नोव्हेंबर १९६३ रोजी मा. कन्नमवार साहेबांचा मृत्यू झाला. त्याचा दुष्परिणाम महाराष्ट्र राज्याच्या विकासावर झाला. मा. कन्नमवार साहेबांना जिजाऊ व सिंदखेड राजाबद्दल अतीव जिव्हाळा, प्रेम व अभिमान होता. त्याचे कारण कदाचित त्यांच्या जीवनात आईचे अचानक निधन झाल्यामुळे असावे. परंतु आज सन २०१५ मध्ये सिंदखेड राजा शहर वा सर्वच परिसरात जो काही विकास दिसत आहे. त्याचे सर्वच श्रेय मूळच्या जाधव घराण्यानंतर केवळ व केवळ दिवंगत मा. मुख्यमंत्री मा. सां. कन्नमवार यांच्याकडेच द्यावे लागेल. आज दुसरबीड येथे बंद पडलेला जिजामाता सहकारी साखर कारखाना हा विदर्भातील पहिला साखर कारखाना मंजूर करण्याचे कामही जिजामातेवरील श्रद्धेपायीच मा. कन्नमवारांनी केले होते. आज मराठा सेवा संघ जे काही करत आहे. त्यात मा. कन्नमवारांनी केले होते. आज मराठा सेवा संघ जे काही करत आहे. त्यात मा. कन्नमवारांनीं पाहिलेल्या जिजाऊंच्या भव्य अशा ‘जिजाऊ स्मारकाचा’ समावेश आहे. या निमित्ताने आम्ही सर्वच मा. कन्नावारसाहेबांप्रती कृतज्ञ आहोत.
पुरुषोत्तम खेडेकर.
Reviews
There are no reviews yet.