Description
या पुस्तकात भारतातील प्राचीन बौद्धस्थळांच्या इतिहासावर दृष्टिक्षेप टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. बुद्ध धम्माला अत्यंत उज्ज्वल इतिहास प्राप्त झालेला आहे. बुद्ध धम्माने तो घडविला आहे. भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासामध्ये बुद्धधम्माइतका उज्ज्वल इतिहास अन्य कोणत्याही धर्माला प्राप्त झालेला नाही. भारतापुरते बोलावयाचे झाल्यास भारतात ऐसा एकही प्रांत नाही अथवा एकही कड़े – कपारी नाही की जिथे बौद्धखुणांचे अस्तित्व नाही. भारत भूमीचा प्रत्येक कण प्राचीन काळपासूनच ‘बुद्ध सरणं गच्छामि’च्या उद्घोषाने भारावून गेलेला आहे. बौद्ध भिक्षूंच्या काशाय वस्त्रांनी झगमगलेले ‘जम्बूद्वीप’ पुढे अज्ञान अंधकाराच्या गर्तेत गुडूप झालेले दिसून येते. पाश्चात्यांनी भारत पादाक्रांत केला आणि माणसाआड़ झालेल्या बौद्धखुणा पुन्हा प्रकाशित होऊ लागल्या. अनेक बौद्ध खुणा जागतिक वारसा ठरू लागल्या.

Reviews
There are no reviews yet.