प्राचीन भारत विरोधाभासांची संस्कृती
₹500.00 ₹450.00
6 in stock
पुस्तकाचे नाव |
प्राचीन भारत विरोधाभासांची संस्कृती |
लेखक |
उपिंदर सिंह |
ISBN |
-- |
भाषा |
मराठी |
पुस्तक बांधणी |
पेपरबॅक |
पानांची संख्या |
२७२ |
आकार |
५.५ * ८.५ इंच |
वजन |
३६५ ग्रॅम |
Description
प्राचीन भारत : विरोधाभासांची संस्कृती या पुस्तकातून भारतातल्या एक सुप्रसिद्ध इतिहासतज्ञ वाचकांना आपल्या प्राचीन भूतकाळाच्या शोधाचा एक रोमांचक प्रवास घडवतात.
उपिंदर सिंह आपल्याला प्राचीन भारताबद्दलच्या आपल्या साचेबद्ध कल्पना बाजूला ठेवत त्या काळातील पाच प्रभावी विरोधाभासांचे सहअस्तित्त्व लक्षात घ्यायला लावतात – सामाजिक विषमता आणि सर्वांसाठी मुक्तीचे वचन, वासना आणि विरक्ती या दोन्हींना दिलेले महत्त्व, देवीमाहात्म्य आणि स्त्रीद्वेष, हिंसा आणि अहिंसा आणि शेवटी धार्मिक क्षेत्रातली वादविवादांची परंपरा आणि संघर्ष. या विरोधाभासांच्या मांडणीसाठी त्यांनी अतिशय वैविध्यपूर्ण स्त्रोतांचा वापर केला. त्यात धार्मिक तत्वज्ञान विषयांवरचे ग्रंथ आहेत; महाकाव्ये, कविता, नाटके, वेगवेगळ्या शास्त्रांवरील ग्रंथ, प्रहसने, चरित्रे, शिलालेख आहेत; तसेच उपखंडात सर्वत्र पसरलेल्या स्थळांवरचे पुरातत्वीय अवशेष आणि कलांचे भौतिक- सौंदर्यशास्त्रीय पुरावेही आहेत. सिंग यांची शैली अभ्यासकीय असली तरी अत्यंत सोपी आहे. त्यांची स्वच्छ स्पष्टीकरणे आणि संतुलित अन्वयार्थ यातून एका तज्ञ इतिहासकाराचे सखोल आकलन दिसून येते आणि ज्याला आपण प्राचीन भारतीय संस्कृती म्हणतो, त्या संस्कृतीचे अनेक धागे हळूहळू उलगडत जातात. हा आपला लांबवरचा भूतकाळ असला तरी तो मृत झालेला किंवा विस्मृतीत गेलेला नाही, कारण अगदी आजही वेगवेगळ्या संदर्भात त्याचा उल्लेख केला जातो. शिवाय गेल्या अनेक शतकांतल्या प्रचंड ऐतिहासिक बदलांनंतरही यात चर्चा केलेले विरोधाभास वर्त्तमानात तसेच दिसून येतात.
सुंदर रीतीने लहिलेले, अत्यंत अभिनव असे ‘प्राचीन भारत : विरोधाभासांची संस्कृती’ हे पुस्तक प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक कलेतील उत्कृष्ट प्रतिमांनी सजले आहे. प्राचीन भारतातील समृद्ध व्यामिश्रता आणि तिचे वर्त्तमानाशी असलेले दुवे ते सुस्पष्ट आणि आकर्षकरीत्या जिवंत करते.
Reviews
There are no reviews yet.