कुळवाडी भूषण

90.00

Out of stock

पुस्तकाचे नाव कुळवाडी भूषण
लेखक पुरुषोत्तम खेडेकर
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २००
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २२४ ग्रॅम

Description

स्वराज्यात महिलांचा अत्युच्च आदर होता. महिलांना पुरुषांच्या बरोबरीचे अधिकार असत. त्यासाठी शिवरायांनी स्वतः आपल्या कुटुंबापासून हा आदर्श घालून दिला होता. महाराजांचे सर्वच जीवन घडविण्यामध्ये आई जिजाऊंचाच पूर्ण सहभाग होता. त्यामुळे महिलांच्या क्षमतेबाबत महाराजांना अतीव आदर होता. त्यामुळे स्वराज्यासह व्यक्तिगत वा कौटुंबिक निर्णय प्रकियेमध्ये महाराज जिजाऊ, राणी,सून येसूबाई, मुली वा प्रधान मंडळातील परिचयातील महिलांचा सल्ला व सहभाग जरूर घेत. ‘यथा राजा तथा प्रजा’. या तत्वानुसार स्वराज्यातही प्रत्येक निर्णय प्रक्रियेत महिला सहभागाचा प्रसार झाला. प्रत्येक कुटुंबात सर्वानुमते विचारविनिमय होऊ लागले. परिणामी समाजातही तीच भावना निर्माण झाली. पुरुष घरात व गावात नसल्यास उद्भवणाऱ्या आकस्मिक प्रसंगांना तोंड देण्याची शारीरिक, मानसिक वा बौद्धिक तयारी महिलांची झाली. याशिवाय अधिकारामुळे महिलांच्या विचारसरणीत बदल होऊ लागला. त्या चांगल्या – वाईटाचा विचार करू लागल्या. तर्काचा वापर करू लागल्या. आपसात सामूहिक चर्चा सुरु झाल्या. यातून महिलांचाही व्यक्तित्वाचा विकास होऊ लागला.अंधश्रद्धाही कमी झाल्या. सामाजिक एकलमयता व बंधुभाव वाढीस लागला. परिणामी स्वराज्य सर्वांगाने समृद्ध झाले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कुळवाडी भूषण”

Your email address will not be published. Required fields are marked *