होमो डेअस

450.00

4 in stock

पुस्तकाचे नाव होमो डेअस
लेखक युव्हाल नोआ हरारी
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५०६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ५०० ग्रॅम

Description

जुन्या रुजलेल्या संकल्पनांचा जेव्हा कुत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence ) आणि जेनेटिक इंजिनिअरिंग यांसारख्या जणू परमेश्वरासारखी शक्ती बहाल करणाऱ्या तंत्रज्ञानाशी संयोग झाला तर काय घडू शकेल, याचा या पुस्तकात वेध घेण्यात आला आहे.

या आधीच्या सेपियन्स या पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे मानवानं देव, पैसा, समानता आणि स्वातंत्र्य यांसारख्या काल्पनिक, पण सर्वमान्य संकल्पनांवर विश्वास ठेऊन सार जग काबीज केलेलं आहे. होमो डेअसमध्ये प्रा. हरारी यांनी भविष्याचा वेध घेतलेला आहे. उत्क्रांतीमागच्या नैसर्गिक निवडीच्या मूळ रेट्याची जागा बुद्धिमान रचनेनं घेतल्यानं जगातील शक्तींमध्ये कसा बदल होईल, याचाही वेध घेतलेला आहे.

आपल्या आवडीनिवडी, आपले राजकीय प्राधान्यक्रम जितके आपल्या स्वतः ठाऊक आहेत, त्याहीपेक्षा जर गुगलला आणि फेसबुकला ठाऊक असतील तर लोकशाहीच नेमकं काय होईल ? भविष्यात कॉम्प्युटर्स माणसांना निकराच्या बाजारपेठेतून हुसकावून लावतील आणि मोठ्या प्रमाणावर ‘निरुपयोगी वर्ग ‘ तयार होईल, तेव्हा कल्याणकारी राज्याचं काय  होईल, इस्लाम जेनेटिक इंजिनिअरिंगची हाताळणी नेमकी कशी करेल? सिलिकॉन व्हॅली केवळ नवनवी उपकरण तयार करण्याऐवजी चक्क नवे धर्म तयार करेल का ?

जसजसं तुम्हा – आम्हा होमो सेपियन्सचं रूपांतर होमो डेअसमध्ये होत आहे तसतसं आपण स्वतःसाठी कोणतं भविष्य निश्चित करत आहोत? आपण स्वतःला पृथ्वीवरच्या देवांच्या रूपात घडवत असलो, तर मग नेमके कोणते कार्यक्रम आपण हाती घेतले पाहिजेत? आज मरणाच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या ग्रहाला आणि खुद्द मानवजातीला आपण स्वतःच्याच विनाशकारी शक्तीपासून कसं वाचवू शकू? होमो डेअस या ग्रंथात एकविसाव्या शतकाला आकार देणारी स्वप्न आणि दुःस्वप्नं या दोन्हीचाही वेध घेतलेला आहे.

होमो डेअस या पुस्तकात मानवाला एकविसाव्या शतकात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या मोठ्या भविष्यवेधी कार्यक्रमाची चिकित्सा केलेली आहे. आत्तापर्यंत हे पुस्तक जगभरातील पन्नास भाषांत अनुवादित झालेले आहे व त्याच्या सुमारे साठ लाख प्रतींची विक्री झालेली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “होमो डेअस”

Your email address will not be published. Required fields are marked *