Description
मराठ्यांच्या इतिहासात हा वस्तुत: भारताचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या या स्वराज्याचे १८ व्या शतकात भारतातील एका प्रमुख मराठी सत्तेत रूपांतर झाले, आणि प्रत्यक्ष वा अप्रत्याक्षरीत्या मराठ्यांचे वर्चस्व उत्तर आणि दक्षिण भारतात प्रस्थापित झाले. म्हणूनच मराठ्यांचा आद्य इतिहासकार ग्रैंड डफ म्हणतो की, इंग्रजांनी भारत जिंकला तो मराठी सत्तेचा बिमोड करून मराठी सत्तेचा उदय, विकास आणि अस्त कसा झाला हे कोडे उलगडविण्यासाठी देशी – विदेशी इतिहासकारांनी १७ व्या शतकापासून आजतागायत अनेक प्रयत्न केले आहेत. पोर्तुगीज बखरकार कोस्मिइद ग्वार्द याने तर १६९५ सालीच पाहिले शिवचरित्र रचले. रॉबर्ट ऑर्म, स्प्रेंगेल, स्कॉटवेअरिंग, ग्रैंड डफ, किंकेड इत्यादी यूरोपीय इतिहासकारांनी मराठ्यांच्या इतिहासावर उत्स्फूर्तपणे लेखन केले आहे. ग्रैंड डफने तर पडरमोड करून मराठ्यांच्या परिचय आपल्या इतिहासाद्वारे यूरोपीय जनतेला करून देण्याचा आद्य प्रयत्न केला. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाच्या अध्ययनामागील नैतिक भूमिका विशद करून दाखविली आणि मराठी सत्तेच्या उत्कर्षाची उत्कृष्ट मीमांसा या शतकाच्या प्रारंभीच केली.
Reviews
There are no reviews yet.