तळेगाव ढमढेरे गावचा इतिहास

400.00

5 in stock

पुस्तकाचे नाव तळेगाव ढमढेरे गावचा इतिहास
लेखक पद्माकर ज्ञानोबा गोरे
ISBN 978-93-47222-02-3
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या --
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २४८ ग्रॅम

Description

              इतिहासाचे लेखन व संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्याने इतिहास लेखनात कोणाचाही व कोणताही शब्द अंतिम असत नाही. एखाद्या देशाचा किंवा गावाचा इतिहास शंभर टक्के परिपूर्ण लिहून झाला, असे होत नाही. तर त्याकडे वाटचाल सुरु असते. इतिहास लेखनासाठी आवश्यक असलेली साधने जशी उपलब्ध होत जातील तसा त्या देशाचा किंवा गावाचा इतिहास अधिक परिपूर्णतेकडे जात असतो. तळेगावच्या इतिहासाच्या बाबतीत आपणास असेच म्हणावे लागेल.

             राष्ट्रकूट आणि यादवकालीन शिलालेखांपासून ते भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या नोंदीपर्यंत अनेक प्रकारची संदर्भ साधने वापरून तळेगाव ढमढेरे या गावाशी संबंधित विविध घडामोडींचे एकत्रित स्वरुपात कथन या पुस्तकामध्ये केले आहे. शिवकालीन आणि पेशवाईतील अनेक राजकीय घडामोडीत अग्रभागी असणाऱ्या व्यक्ती, सत्यशोधक समाजासारख्या समतेच्या चळवळीत योगदान देणारे कार्यकर्ते, सत्याग्रहाच्या आणि क्रांतिकारकांच्या मार्गाचा अवलंब करून स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभागी असणाऱ्या माणसांच्या आणि संस्थांच्या कार्याचं परिशीलन या पुस्तकामध्ये केले आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तळेगाव ढमढेरे गावचा इतिहास”

Your email address will not be published. Required fields are marked *