स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी समज-अपसमज

145.00

Out of stock

पुस्तकाचे नाव स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी समज-अपसमज
लेखक आनंद घोरपडे
ISBN 978-93-81451-19-8
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

नव्या संशोधनावर आधारित शंभुराजांच्या खऱ्या इतिहासावर प्रकाश टाकणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.

मराठ्यांच्या इतिहासातील एक लखलखते पर्व म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ! स्वकीय घरभेद्यांनी स्वराज्याच्या संकल्पनेला मूठमाती देण्याचे धोरण आखलेले असताना आणि चहूबाजूंनी परकीय सत्ता स्वराज्याचे लचके तोडायला टपलेली असताना आपल्या देदीप्यमान कर्तृत्वाने स्वराज्याचे संरक्षण आणि वृद्धी करणारे छत्रपती संभाजी हे खऱ्या अर्थाने लोकनायक होते. सुसंस्कृत, अभ्यासू आणि पराक्रमी शंभूराजांना परकीय शत्रूनी जितके छळले नाही, तितके स्वकीय लेखणीबहाद्दर इतिहासकारांनी छळले.

महत्प्रयासाने हाती सापडलेला हा महापराक्रमी व बुद्धिवान राजा आपल्या तावडीतून सुटू नये म्हणून औरंगजेबाने सर्वप्रथम त्यांचे डोळे काढले. परंतु स्वकीय इतिहासकारांनी हा राजकीय संघर्ष ‘धर्मसंघर्ष’ म्हणून नोंदवला. शिवाय जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा शंभूराजांची बदनामी केली, जेणेकरून मराठी माणसाला शंभूराजांबद्दल आत्मीयताच वाटू नये. वा. सी. बेंद्रे, डॉ. कमल गोखले, कॉ. शरद पाटील या सत्यशोधक इतिहासकारांच्या पंक्तीतील एक नाव म्हणजे आनंद घोरपडे ! सामान्य वाचकांना शंभूराजांच्या खऱ्या अभिमानास्पद इतिहासाचा परिचय करून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य आनंद घोरपडे यांनी या महत्त्वपूर्ण पुस्तकाद्वारे केले आहे. वास्तव इतिहास जाणून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक वाचकाने वाचलाच पाहिजे असा हा इतिहासग्रंथ आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी समज-अपसमज”

Your email address will not be published. Required fields are marked *