Description
संभाजी महाराजांच्या बाणेदार व तेजस्वी कारकीर्दीचा अत्यंत दुर्दैवी भाग म्हणजे कैद होईपर्यंत हिंदवी स्वराज्याचा कोणताही गड अथवा प्रदेश मोगलांच्या हाती पडला नव्हता. उलट उत्तरेकडील व दक्षिणेकडील मोगली प्रदेशच संभाजीराजांनी मिळवला होता. त्यांनी स्वपराक्रमाने आपलं छोटं राज्य रक्षिलं. त्याकरिता वेदनामय हौतात्म्य पत्करलं, तरी संभाजीराजांना (मुळात तसे नसताना) बराच काळ व्यभिचारी, व्यसनी, राज्य विध्वंसणारे असं ठरवण्यात हिंदू सनातन्यांना यश आलं. आणि ज्यांनी प्रत्यक्ष प्रजाप्रिय राजाला ठार मारण्याचे अनेक वेळा प्रयत्न केले, राजाला पकडून देण्यास शत्रूला मदत केली, ज्यांनी राज्याचा मोठा हिस्सा शत्रूला खुशाल देऊन टाकण्याचा स्वार्थी डाव टाकला, बलाढ्य शत्रूशी लढा देण्यापेक्षा भेकडपणे त्यास शरण जाऊन त्यांची मांडलिकी पत्करण्याचे व्यूह रचले, ते भ्रष्ट, कपटी, पाताळयंत्री, सनातनी सरकारकून मात्र इतिहासात करड्या व करारी स्वभावाचे व जाणकार म्हणवून रंगवले गेले. असे का घडले ?
Reviews
There are no reviews yet.