स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ

27.00

Out of stock

पुस्तकाचे नाव स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ
लेखक अशोक राणा
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ६४
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ६५ ग्रॅम

Description

‘राष्ट्रमाता जिजाऊ’ यांच्या जीवनातील काही महत्वाच्या प्रसंगांवर आधारित हि पुस्तिका आपणापुढे सादर करताना अतिशय आनंद होत आहे. हि या पुस्तिकेची सुधारित तिसरी आवृत्ती आहे. यापूर्वी मराठा सेवा संघांच्या यवतमाळ शाखेने मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राजे लखुजी जाधवरावांच्या वाड्याशेजारी झालेल्या जिजाऊ जन्मोत्सवात कलावती जयश्री गडकर यांच्या हस्ते तिचे प्रकाशन केले होते. त्यावेळी त्यांनी ‘जिजाऊंच्या पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते होत आहे, यात मला धन्यता वाटते आहे.’ असे उदगार काढले होते. ‘जिजाऊंचे व्यक्तिमत्त्व साकारणारी भूमिका करणे हि आपली इच्छा अपूर्ण आहे.’ असे यावेळी त्या म्हणाल्या होत्या. कलावंतांना जिजाऊंच्या व्यक्तिमत्वाचे आकर्षण आहे; तसेच सबंध शिवप्रेमींनाही आहे.
शिवधर्माची प्रेरणा म्हणून जिजाऊंचे स्थान अत्युच्च ठरले आहे. केवळ राजकीय नव्हे तर सामाजिक व धार्मिक दृष्टीने जिजाऊंकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन या निमित्ताने पुढे येत आहे. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व समजून घेणे आवश्यक आहे. या हेतूने या प्रयत्नाकडे पहावे हि अपेक्षा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता जिजाऊ”

Your email address will not be published. Required fields are marked *