Description
शिवराज्याभिषेक व क्षत्रियत्वाचा प्रश्न
‘शिवराज्याभिषेक’ ही मध्ययुगीन भारतातील एक क्रांतिकारक घटना होय. देशाच्या तीन-चतुर्थांश भागावर अधिसत्ता गाजविणाऱ्या मोगली सत्तेला तिने सुरूंग लावला. तसाच उर्वरित भागातील राज्यकर्त्यांना दिलासा दिला. आपणही राज्यकर्ते होऊ शकतो, असा आत्मविश्वास त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला.
अशा या उत्साहवर्धक प्रसंगाला दुसरी एक काळीकुट्ट बाजू आहे. महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी त्यांनीच निर्माण केलेल्या धर्मग्रंथांच्या आधारे शिवरायांचा राज्याभिषेकाचा अधिकार नाकारला होता. शिवराय क्षत्रिय नसून शूद्र आहेत, असे त्यांचे म्हणणे होते.
शिवरायांनाच प्रस्थापित वैदिक ब्राह्मणी धर्मव्यवस्था शूद्र मानत असेल तर मग क्षत्रिय कोण ? शिवरायांनी या धर्मव्यवस्थेला दणका देण्याकरिता एक पाऊल मागे घेतले. ते म्हणजे वैदिक राज्याभिषेक होय. यामागे घेतलेल्या पावलानंतर पुढे टाकलेले पाऊल म्हणजे दुसरा राज्याभिषेक. असे दोन शिवराज्याभिषेक झाले होते व त्यामागे ब्राह्मणी धर्म व्यवस्थेला शह देण्याचा हेतू होता, हे बहुधा सर्व सामान्यांना माहीत नाही. ही माहिती देण्याच्या ह्या पुस्तिकेचा हेतू आहे.
Reviews
There are no reviews yet.