Description
व्यक्तिगत कर्तृत्वात शिवाजी महाराज आपल्या सर्व समकालीन योद्ध्यांत अग्रेसर होते. कारण त्याच्या इतका मोठा पल्ला कोणत्याही सेनानीने गाठला नाही. असे ऑर्मचे मत आहे. सुरतेच्या इंग्रजांच्या पत्रात १६७७ मध्ये म्हटले आहे की, ‘सुरतेपासून कन्याकुमारीपर्यंत कोणत्याही विरोधाला न जुमानता तो आपला प्रदेश वाढवील.’ तर मुंबईकर इंग्रज लिहितात, ‘सिझरच्या स्पेनवरील स्वारीप्रमाणे दक्षिणेत तो आला, त्याने पाहिले व त्याने जिंकले. सिकंदरपेक्षाही तो पराक्रमी आहे.’ दुसऱ्या एका पत्रात मुंबईकर इंग्रज लिहितात, ‘आपल्या कुलदेवतेसमोर त्याने शपथ घेतली आहे की, विजापूर घेऊन दिल्लीवर हल्ला करायचा व औरंग्याला तेथे कोंडायचे आणि मगच तलवार म्यानात घालायची.’ मुंबईहून लंडनला १६७८ मध्ये लिहिलेल्या एका पत्रात शिवाजी महाराज यांना सारियस व हॅनिबॉल म्हटले आहे. पाश्चात्त्यांचे हे शिवाजी महाराजांच्या संबंधी लेखन वाचल्यावर शिवाजी महाराज खरोखरी युद्धात पहिले, शांततेत पहिले व साडे तीनशे , वर्षांनंतरही आपल्या देशबांधवांच्या हृदयातही पहिलेच राहिले आहे, यात आश्चर्य कोणते ?
Reviews
There are no reviews yet.