सातारा जिल्ह्यातील शिवकालीन गडकोट – किल्ले

61.00

Out of stock

पुस्तकाचे नाव सातारा जिल्ह्यातील शिवकालीन गडकोट – किल्ले
लेखक गणपतराव साळुंखे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ५२
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन ३५ ग्रॅम

Description

शिलाहार राजा भोज याने पंधरा किल्ले बांधले. त्यापैकी बहुतेक किल्ले सातारा जिल्ह्यात आहेत.  शिवकाळात संपूर्ण सातारा जिल्हा आदिलशहाच्या अंमलाखाली होता.  तथापि अफझलखानाच्या वधानंतर म्हणजे 10 नोव्हेंबर 1659 नंतर शिवाजी महाराजांनी या जिल्ह्यातील किल्ले सर करीत सन 1680 पर्यंत पूर्वेकडील थोडासा भाग वगळता संपूर्ण सातारा जिल्ह्याचा परिसर स्वराज्यात सामील केला.  अठराव्या शतकात अटकेपर्यंत विस्तारलेल्या मराठा राज्याची राजधानी सातारा किल्ला उर्फ़ अजिंक्यतारा किल्ला होता.

घाटमाथ्यावरील प्रतापगड, मकरंदगड, महिमानगड, वासोटा, जयगड हे निबिड अरण्यातील किल्ले शिवछत्रपतींनी स्वराज्यात सामील करून घेतल्यावर त्यांच्या  एकाही शत्रुला ते परत जिंकून घेता ाले नाहीत.  हे किल्ले सन 1818 मध्ये इंग्रजांनी घेईपर्यंत मराठी सत्तेच्या अंमलाखाली राहिले.  यावरून स्वराज्य उभारणीतील सातारा जिल्ह्याचे योगदान महत्त्वाचे ठरते. सातारा जिल्ह्यातील एकही किल्ला शिवकाळानंतर बांधलेला नाही.  हे या जिल्ह्यातील किल्ल्यांचे वैशिष्ट्य आहे.  सातारा जिल्हा पूर्वीपासूनच गडकोट व मजबूत तटबंदीने भक्कम किल्ल्यांनी समृद्ध असलेला जिल्हा.

स्वराज्यातील अनेक किल्ल्यांपैकी एकट्या सातारा जिल्ह्यात चोवीस गडकोट किल्ले इतिहासाची साक्ष डेट ताठ मानेने उभे आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सातारा जिल्ह्यातील शिवकालीन गडकोट – किल्ले”

Your email address will not be published. Required fields are marked *