Description
छत्रपती शिवाजी महाराजांनी छेडलेली जंग हि आशिया खंडातील सगळ्यात सामर्थ्यवान सुलताना विरुद्ध होती. तो सुलतान क्रूर होता, धूर्त होता, हुशार होता, द्रष्टा होता ह्या सोबतच भयंकर महत्त्वाकांक्षी होता. थंड रक्ताचा अणि धोरणी मेंदूचा होता. लोभी होता पण फकिराप्रमाणे राहायचा. धर्मवेडा किंवा धर्मांध नव्हता पण धार्मिक वर्तन करून लोकांना भावनिक करण्याचे अद्भुत कसब त्याच्याकडे होते. त्याच्या ह्या सर्व गुणांचा वापर करून त्याच्या इतक्याच ताकदीच्या सगळ्या शत्रूंना संपवून तो मुघल तख़्तावर बसला खरा, पण स्वत:ला नियती म्हणजेच मुकद्दर समजणारा हा सुलतान अखेर स्वत:चे मुकद्दर लिहू शकला नाही. दख्खनच्या पहाडांनीच त्याच मुकद्दर लिहिलं
महाराजांच्या निधनानंतर सुद्धा तब्बल 26 वर्षे मराठे तळहातावर शिर घेऊन ह्या क्रूर सुलतानाशी लढले. त्या पराक्रमाची याद म्हणजेच औरंगजेबाचे हे चरित्र … !
Reviews
There are no reviews yet.