Description
कुणाच्या ताटातलं काढून आमच्या ताटात टाका, अशा प्रकारची मागणी कुणाची नाही आणि जोपर्यंत इतरांच्या कोणत्याही न्याय्य हक्कावर अतिक्रमण घडत नाही, तोपर्यंत समाजातील इतर घटकांनी कोणत्याही प्रकारची चिंता करण्याचं कारण नाही, असं मला वाटतं. गेल्या काही वर्षांमधे वेगवेगळ्या कार्यकत्यांनी जोडण्याचं काम केलं आहे, तोडण्याचं नाही, आणि ते पुढे कोणी करता कामा नये. समाजातल्या सर्व घटकांनी आधुनिक काळाचा विचार करता है आवर्जून ध्यानात घेतलं पाहिजे. जोपर्यंत इतरांच्या हिताला कोणताही धा लावला जात नाही, तोपर्यंत स्वतःची दुःखं मांडण्याचा, स्वतःच्या अडचणी समाजापुढं ठेवण्याचा, आमचे हे हे प्रश्न आहेत असे म्हणण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आणि त्यामुळं त्या बाबतीमधे कारण नसताना कोणत्याही बाजूनं एकमेकांच्याविषयी किल्मिष निर्माण होऊ नये. शेवटी आपल्याला एकाच भारतीय समाजात एकत्र रहायचं आहे. याच देशात, याच भूमीवर एकत्र नांदायचं आहे. द्वेषानं, तिरस्कारानं आणि तिटकाऱ्यानं शत्रू निर्माण होतील, कोणाचंही भल होणार नाही.
…….. इतके शेतकरी आत्महत्या करतात, तेव्हा त्यांचं काही दुखणं आहे, हे बघायचंच नाही काय ?
डॉ. आ. ह. साळुंखे
Reviews
There are no reviews yet.