Description
शत्रूला शक्यतो न मारता दहशत बसवून विजय मिळविणे. गनिमी काव्याने युद्ध करणे. शत्रूचे सैन्यसंख्याबल किती आहे हे पाहून युद्धाची दिशा ठरविणे. वेळप्रसंगी आपले सैन्यबल कमी असेल तर माघार घेणे किंवा तह करणे. शत्रूच्या गाफीलपणाचा फायदा घेऊन अचानक हल्ला करणे. एकाच वेळी अनेक शत्रूंशी न लढणे. अन्न, पाणी, चारा बंद करून शत्रूचा कोंडमारा करणे. युद्धात स्त्री, ब्राह्मण व लहान मुले तसेच वृद्ध यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय न करणे. शत्रूचा धर्म आणि धर्मग्रंथ यांची विटंबना न करणे. शेतकऱ्यांच्या पिकाची नासधूस न करणे. निःशस्त्र शत्रू शरण आल्यास त्यास जीवदान देणे. शौर्य गाजविणाऱ्यांचा यथोचित सन्मान करणे. शत्रूचे सैनिक शरण आल्यास त्यांना जीवदान देऊन त्यास आपल्या सैन्यात दाखल करून घेऊन पुढे त्यांच्यामध्ये पराक्रम दिसून आल्यास त्यांना मानाची पदे व बढत्या देणे. शिवरायांनी स्वकर्तृत्वावर जिद्द, चिकाटी, अविश्रांत परिश्रम, धाडस, बुद्धिचातुर्य इत्यादी गुणांच्या साहाय्याने बहुजन समाजाच्या कल्याणासाठी स्वराज्य निर्माण केले यातच त्यांचे श्रेष्ठत्व दिसून येते.
Reviews
There are no reviews yet.