Description
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रकारे शहाजींचा पुत्र शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल व ही राजमुद्रा फक्त लोकांच्या कल्याणासाठी चमकेल.
मराठ्यांचे नाव जगाच्या इतिहासात अजरामर करून ठेवणाऱ्या ह्या महाप्रतापशाली राष्ट्रीय वीराच्या अतुलनीय पराक्रमांचे विस्तृत वर्णन स्वतंत्र चरित्रलेखाच्या रुपाने करण्याकामी महाराष्ट्रातील मोठमोठ्या विद्वान ग्रंथकारांकडून आजपर्यंत आळस किंवा अनास्था का झाली हे कळत नाही. पूर्वकालीन बखरकारांनी व कवींनी शिवाजी महाराजांचा चरित्रमाहिमा आपापल्या माहितीप्रमाणे व शक्तीप्रमाणे इतका गाइला असता, आधुनिक विद्या विचारसंपन्नतेच्या काळात स्वदेश, स्वराज, स्वातंत्र्य इत्यादिकांविषयी सदोदित विचार प्रकट करणाऱ्या पंडितांकडून ह्या महापुरूषाविषयी नुसता तोंडाने अभिमान प्रकट करण्यापलीकडे काहीच होऊ नये, हे चमत्कारिक दिसते. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्याचा अपहार करणाऱ्या किंवा स्व-देशाचा नाश करण्यास प्रवृत्त होणाऱ्या अनेक पुरूषांची चरित्रे मराठीत प्रसिद्ध व्हावीत आणि ज्या प्रौढप्रताप वीरमणीने स्वदेशास स्वातंत्र्य मिळवून देण्याचे सुयश संपादिले.
Reviews
There are no reviews yet.