Description
प्रस्तुत तिसऱ्या खंडात १७६१ – १८४८ हा मराठ्यांच्या इतिहासाचा शेवटचा कालखंड घेतलेला आहे. हा शेवटचा कालखंड साधनांच्या विपुलतेमुळे आणि लेखनासाठी त्या त्या विषयातील तज्ज्ञ लाभल्यामुळे काहीसा विस्तृतपणे मांडला आहे आणि त्यामुळे काही प्रकरणांची लेखन – सीमा थोडीशी लांबली आहे.
मराठी सत्ता रूढार्थाने जरी १८१८ मध्ये पेशवा बाजीरावाच्या शरणागती बरोबर नष्ट झाली आहे असे मानले तरी ती वास्तविक संपुष्टात आली ती १८४८ – ४९ मध्येच होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी गादीची स्थापना १७ व्या शतकात केली आणि तिचा शेवट इंग्रजांनी साताऱ्याची गादी खालसा करून कसा केला ही हकीगत या खंडातील सातारा या प्रकरणात मुद्दाम घातली आहे. तसेच मराठ्यांना नमविण्याच्या कामी मुत्सद्देगिरी आणि युद्ध नेतृत्व या दोन्ही दृष्टींनी ज्याने महत्त्वाची भूमिका वठविली आणि इंग्रजी सत्ता महाराष्ट्रात रुजविण्याचे महान कार्य ज्याने केले त्या माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनच्या कार्याचा एका स्वतंत्र प्रकरणात प्रस्तुत खंडात परिचय करून दिला आहे.
Reviews
There are no reviews yet.