छत्रपती शंभूराजे कृत नायिकाभेद, नखशिख व सातशतक

100.00

1 in stock

पुस्तकाचे नाव छत्रपती शंभूराजे कृत नायिकाभेद, नखशिख व सातशतक
लेखक प्रभाकर ताकवले
ISBN 978-81-956984-5-5
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या ११९
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १६० ग्रॅम

Description

धीरवीर व पुण्यश्लोक श्री शिवरायांचे सवाई वारसदार, तेजोदीप छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रत्युत्पन्नर्मात ‘बुधभूषण’ या सार्थ स्वकुलवर्णनाच्या मार्मिक वंदनांच्या अन्योक्तिवृंदानंतर अनेक पूर्वसूरी दंडनीतिज्ञ पंडितांच्या संस्कृत कोषागारातील वचनांच्या मार्मिक मागोवा घेतलेल्या जवळपास सहस्त्र श्लोकांचे मराठी भाषांतर शिव-शंभू कृपेने आम्ही सर्वदूर पसरलेल्या मराठमोळ्या भाविकांसाठी सिद्ध केले. त्या कृपाप्रसादानंतर श्री शंभूराजांच्या शेष तीन हिंदी ग्रंथाकडे (नायिकाभेद, नखशिख व सातशतक) आम्ही वळलो. महाराष्ट्रातील धांडोळयात जेवढी पदे हाती लागली ती या हिंदी त्रयदलात अनुवादली आहेत. शेष पदासाठी श्री शंभू प्रेमींसह, मधुसंचय जारी आहे.  तोपर्यंत ही त्रिदलातील पानफूले मनोभावे, दुसऱ्या पूजेसाठी ठेवून घ्या. त्यांचा प्रभाव सुगंध खचितच वाचकास आगळा-वेगळा अनुभव देईल. धागे से पता चलेगा ताग किस का है!

श्री शंभो: शिवजातस्य, मुद्रा द्यौरिव राजते । 

यदंकसेविनो लेखा, वर्तते कस्य नोपरि ।। 

छत्रपती शिवाजीराजे यांचे पुत्र श्री. संभाजीराजे यांची मुद्रा आकाशाप्रमाणे शोभत आहे. तिचे अंकसेवन करणारांचा (आधार घेणारांचा) पगडा (प्रथम) कोणावर पडणार नाही? (सगळ्यांच्यावर पडेल.) (षोडश मुद्रा)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “छत्रपती शंभूराजे कृत नायिकाभेद, नखशिख व सातशतक”

Your email address will not be published. Required fields are marked *