कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत मूळ हस्तलिखितांसह

1,125.00

1 in stock

पुस्तकाचे नाव कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत मूळ हस्तलिखितांसह
लेखक नितीन शशिकांत समुद्रेवार
ISBN 978-93-92880-66-7
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पुठ्ठा बांधणी
पानांची संख्या ४४८
आकार ६ * ९ इंच
वजन ८६० ग्रॅम

Description

कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत हे शिवचरित्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण व विश्वसनीय साधन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निकट व्यक्तींपैकी एक कवींद्र परमानंद होते.  भोसले घराण्याविषयी व इतर राजकीय शाहयांविषयी त्यांना सखोल  माहिती होती आणि श्री शिवभारतात ती माहिती मोठ्या प्रमाणात त्यांनी दिली आहे.  शिवरायांविषयी व मावळ्यांविषयी अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग यात आहेत.

श्री शिवभारताच्या हस्तलिखित पोथ्या प्रकाशित करत असताना शक्य तितक्या पोथ्या एकत्र करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यात कोणत्याही पद्धतीने बदल न करता त्या मूळ स्वरूपात प्रकाशित केल्या आहेत.  तसेच या पोथ्यांचा तौलनिक अभ्यास करून मराठी भाषांतर करण्यात आले आहे.  तंजावरच्या संस्कृत पोथीमध्ये काही श्लोक अर्धवट होते, ते महाराष्ट्रात कोल्हापूरला सापडलेल्या पोथीतून घेतले आहेत.

मराठी भाषांतर हे नव्याने करून शक्य तितके सटीक करण्याचा प्रयत्न केला आहे.  हे मराठी भाषांतर सगळ्या पोथ्यांचा अभ्यास करून आले आहे. त्यामुळे वाचकांना कोणतीही उणीव जाणवणार नाही, याची काळजी घेतली आहे. मूळ हस्तलिखिते दिल्यामुळे अभ्यासकांना भाषांतर तपासून घेण्यास सोपे होणार आहे.

अनेक वर्षांपासून महाराष्ट्र या ग्रंथाच्या हस्तलिखितांची वाट पाहत होता आणि आता ती हस्तलिखिते सर्वांना अभ्यासण्यास उपलब्ध होत आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कवींद्र परमानंदकृत श्री शिवभारत मूळ हस्तलिखितांसह”

Your email address will not be published. Required fields are marked *