Description
सोडून ताठा, पाहून तोटा,
उठतोय आता मराठा, जागतोय आता मराठा ।।धृ ।।
मोठेपणात जमिनी गेल्या आणि जहागीर गेली,
मोठ्या वाड्यावर, बड्या घरातून,
राहिलाय रिकामा लोटा ।।
…जागतोय आता मराठा ।।१।।
भावकीच्या भांडणात भांडी बी गेली,
कोंबडी बी गेली अन अंडी बी गेली,
मराठा मालक शेती कराया,
गड्याला मोजतोय नोटा ।।
…जागतोय आता मराठा ।।२।।
भटजीने यांची अक्कल नेली,
शेटजीने याची कापडबी नेली,
त्यांचा फायदा, यांना कळेना,
हाये यांचाच तोटा।।
…जागतोय आता मराठा ।।३।।
मालक पालक साऱ्यांचा वाली,
खांदयावर सारी हा एकटाच खाली,
धन्या धतुरा, चोरा मलिदा,
झालाय व्यवहार खोटा ।।
…जागतोय आता मराठा ।।४।।
अक्कल आता ठिकाण्या अली,
त्येंचा तो वामन आपलार बळी,
शेजारी मरतो, मी का करतो,
आपल्या डोक्याचा गोटा ।।
…जागतोय आता मराठा ।।५।।
आदिवास्यांची अवस्था झाली,
सेवासंघाने जाणीव दिली,
एकीचे बळ, देईल फख,
तीच करील मराठा मोठा ।।
…जागतोय आता मराठा ।।६।।
Reviews
There are no reviews yet.