आपले भवताल

180.00

1 in stock

पुस्तकाचे नाव आपले भवताल
लेखक नितीन हांडे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १२८
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १४२ ग्रॅम

Description

गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून तर आजच्या स्मार्टफोन वापरणाऱ्या स्मार्ट मानवापर्यंत मानवाने जी प्रगती केली आहे, कारण त्याला वेळोवेळी प्रश्न पडले त्याची त्याने उत्तरे शोधली. पाऊस का पडतो? विजा का चमकतात? प्रश्न पडत गेले आणि उत्तरे देखील सापडत गेली. तर्क, निरीक्षण, प्रयोग, अनुमान, आणि प्रचिती या सर्वांचा वापर करत करत त्याने नवीन नवीन शोध लावले. म्हणजेच माणसाचा इतिहास हा प्रश्न पडण्याचा इतिहास आहे. न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडले त्यावेळेस त्याला प्रश्न पडला की ते खालीच का पडले… या प्रश्नातूनच गुरुत्वाकर्षण नियम मांडला गेला. चिकित्सा हीच खरी शोधाची जननी आहे, ऐसे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

जगाच्या तुलनेत भारतामध्ये आजवर मोठ्या संख्येने वैज्ञानिक झाले नाहीत; मात्र याचा अर्थ असा नाही की भविष्यात नाहीत.  त्यासाठी गरज आहे वैज्ञानिक दृष्टिकोण रुजविण्याची. आज विज्ञानाची भाषा वापरून छद्म विज्ञान बोकाळत चालले आहे.  वैज्ञानिक संकल्पना आणि गणिते वापरून सूरू असलेल्या अंधश्रद्धेच्या बाजाराला आपण थोपवले पाहिजे. प्रश्न विचारण्याची संस्कृती जोपासली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोण आपण स्वत: समजून घेऊन इतरांना सांगितला पाहिजे. आपले भवताल हा त्यासाठीचा छोटा प्रयत्न आहे.  लोकांना प्रश्न पडावे, त्याची त्यांनी उत्तरे शोधावी, एकमेकांत चर्चा करावी, ही अपेक्षा ठेवून हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “आपले भवताल”

Your email address will not be published. Required fields are marked *