Description
आपण लोकशाही मार्ग स्वीकारलेला आहे. या जीवनपद्धतीमध्ये कितीही दोष असले, तरी किमान सध्या तरी या पद्धतीला पर्याय देणारी यापेक्षा अधिक निर्दोष पद्धती आपल्याजवळ उपलब्ध नाही आणि ती उपलब्ध होण्याची शक्यताही दिसत नाही. आता, एकदा का लोकशाहीचा मार्ग स्वीकारला, कि संवाद हा एकच पर्याय उरतो आणि म्हणून कितीही त्रास झाला, संयमाचा कितीही अंत पहिला गेला, तरी अहिंसेचा मार्ग हाच अखेरीस सर्वांच्या हिताचा मार्ग आहे, हे कदापि विसरता येत नाही. म्हणूनच आपल्यापुढचे प्रश्न सोडवण्यासाठी, समस्यांचं निवारण करण्यासाठी आपल्याला अहिंसेच्या मार्गानंच जावं लागेल. हिंसेचा मार्ग कदापि कल्याणाचा नाही आणि आपण ती कधी स्वीकारताही कामा नये. त्याला प्रोत्साहन देणं दूरच, त्याला मान्यताही देता कामा नये.
Reviews
There are no reviews yet.