कर्मयोगी ए. पी. जे. अब्दुल कलाम

203.00

Out of stock

पुस्तकाचे नाव कर्मयोगी ए. पी. जे. अब्दुल कलाम
लेखक शरद कुंटे
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या २०७
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन २१० ग्रॅम

Description

भारत एक महासत्ता बनला पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा या देशातील प्रत्येक युवकाच्या मनात निर्माण करण्याचे काम ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी केले. या देशात विविध क्षेत्रात सर्वस्व झोकून देऊन काम करणाऱ्यांनी संख्या कमी नाही. या देशाच्या विकासाचे आराखडे मांडणारे विद्वानही काही कमी नाहीत. पण समाजाच्या सर्व क्षेत्रातल्या मान्यवरांना दिशा देणारा विकासाचा मार्ग कलामांनीच मांडला. हां केवळ विचार मांडून ते थांबले नाही तर आपले सारे जीवन त्यांनी विकसित भारत या ध्येयाच्या वाटचालीसाठी समर्पित केले. हे उद्दिष्ट इसवी सन 2020 पर्यंत आपण गाठू शकू हा आत्मविश्वास त्यांनी समाजाला दिला.

विकासाचा मार्ग चालवण्यासाठी फक्त तळमळ असणे पुरेसे नाही तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात सष्म तंत्रद्न्यान दिले पाहिजे. जगातला कोणीच ते आपल्याला देणार नाही. ते आपले आपणच निर्माण केले पाहिजे हे त्यांनी कृतीने सिद्ध करूँ दाखविले. अवकाश विद्न्यानात भारत आज महासत्ता बनू पाहतो आहे ते कलामांनी त्या क्षेत्रात निर्माण केलेल्या तंत्रद्न्यानाच्या बळावरच. पृथ्वी, अग्नी, आकाश, नाग, त्रिशूल, ब्राम्होस अशी एकापेक्षा एक शक्तिशाली क्षेपणास्त्रे तयार करून त्यांनी भारताच्या संरक्षण सिद्धटेका जगभर धाक निर्माण केला. अशाच प्रकारे शेती, वाहतूक, ऊर्जा, शस्त्र निर्मिती, शिक्षण, आरोग्य, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्पुटर हार्डवेअर, न्यानो टेक्नोलॉजी, बायोटेक्नोलॉजी यासारख्या क्षेत्रातही नवनवीन तंत्र द्न्यान निर्मिती केल्याशिवाय आपण विकसित राष्ट्र होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले.

विकसित भारत हा शहरांचा देश असणार नाही तर समानता असणाऱ्या काही ग्रामसमूहांच्या विकासातून देशाचा विकास होईल ही नवी दिशा त्यांनी दाखविली. या ग्रामसमुहास त्यांनी ‘पूरा’ असे नाव दिले. असे 70000 विकसित पूरा  निर्माण करण्याचा मार्ग त्यांनी प्रशस्त करून दिला हे त्यांच्या जीवनकार्यातील सर्वात मोठे यश आहे. भविष्यात अब्दुल कलाम जगाच्या लक्षात राहतील ते अवकाश वैद्न्यानिक, क्षेपणास्त्र निर्माते, अगर भारताचे राष्ट्रपती म्हणून नव्हे, तर विकसित भारताची पायाभरणी करणारे स्वप्नद्रष्टे शास्त्रद्न्य  म्हणून  !