रजनी ते रज़िया : लढा अस्तित्व आणि अस्मितेचा

225.00

Out of stock

पुस्तकाचे नाव रजनी ते रज़िया : लढा अस्तित्व आणि अस्मितेचा
लेखक रजिया सुलताना
भाषा मराठी
पुस्तक बांधणी पेपरबॅक
पानांची संख्या १९६
आकार ५.५ * ८.५ इंच
वजन १८० ग्रॅम

Description

आत्मकथन लिहिणं ही लेखकाला एक प्रकारची शिक्षाच असते, स्थिरावलेलं आयुष्य ढवळून काढावं लागतं. हे जखमेवर मीठ चोळणंच असतं.  सुखद आठवणींचं काही वाटत नाही, दुःखाची बेरीज-वजाबाकी करतांनी मात्र वेदनांचा आकडा पार होतो.

‘संसारसंन्यासी’ नवऱ्याबरोबर मी गेली कित्येक वर्ष राहते आहे.  मनाचा कोंडमारा होतो.  पण त्यावर मात करत जिद्दीने मी माझा अस्तित्व आणि अस्मितेचा लढा लढले.  वेदनांचं भांडवल नाही, पण संकटं आली तरी स्त्री आयुष्यात ठामपणे उभी राहू शकते, हे मला दाखवून द्यायचं आहे.

त्यात कार्यकर्ती म्हणून माझं क्षेत्रही असंच, जे सहजासहजी कोणी स्वीकारत नाही.  महिलांच्या लैंगिग अधिकारांबरोबरच सेक्सवर्कर, कैदी, किन्नर, समलिंगी यांच्या मानवाधिकारावर काम करतांनी जखमही माझीच नई उपचारही माझेच! हे सगळं आयुष्य कोणताही आडपडदा न ठेवता मी या पुस्तकात कथन केलं आहे.  

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “रजनी ते रज़िया : लढा अस्तित्व आणि अस्मितेचा”

Your email address will not be published. Required fields are marked *